Pravin Darekar | ‘राज्य सरकारच्या मुजोरीला सुप्रीम कोर्टाची चपराक, शेवटी सत्याचाच विजय झाला’

Pravin Darekar | ‘राज्य सरकारच्या मुजोरीला सुप्रीम कोर्टाची चपराक, शेवटी सत्याचाच विजय झाला’

| Updated on: Jan 28, 2022 | 4:51 PM

सत्यमेव जयते शेवटी सत्याचा विजय हा झाला आहे आणि 12 आमदारांच निलंबन हे मागे घेण्यात आलं आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी व्यक्त केली आहे. या सरकारच्या मुजोरीला ही चपकार आहे. अनेक ताशेरे सुप्रीम कोर्टा(Supreme Court)नं राज्य सरकारवर ओढले आहेत. तत्कालिन पीठासीन अध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या चौकशीची मागणी आम्ही करू, असं ते म्हणाले.

सत्यमेव जयते शेवटी सत्याचा विजय हा झाला आहे आणि 12 आमदारांचं निलंबन हे मागे घेण्यात आलं आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी व्यक्त केली आहे. या सरकारच्या मुजोरीला ही चपकार आहे. अनेक ताशेरे सुप्रीम कोर्टा(Supreme Court)नं राज्य सरकारवर ओढले आहेत. तत्कालिन पीठासीन अध्यक्ष भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांच्या चौकशीची मागणी आम्ही करू, असं ते म्हणाले. राज्य सरकार हिटलरशाही पद्धतीनं कारभार करत आहे. त्याला न्यायालयानं चपराक दिली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी. जनतेच्या दरबारात हे सरकार कसं सूडभावनेनं काम करतं, हे सिद्ध झालं, असं ते म्हणाले. राज्य सरकारनं केलेल्या चुकीला प्रायश्चित्त घ्यावं लागेल. आम्ही त्याबद्दल विचारणा येत्या अधिवेशनात करू, असं ते म्हणाले.