Manikrao Kokate खरंच रमी खेळत होते? ‘तो’ व्हिडीओ नेमका काढला कोणी? बघा खरं काय? कोकाटेंनी सगळंच सांगितलं अन्..

Manikrao Kokate खरंच रमी खेळत होते? ‘तो’ व्हिडीओ नेमका काढला कोणी? बघा खरं काय? कोकाटेंनी सगळंच सांगितलं अन्..

| Updated on: Jul 20, 2025 | 3:16 PM

आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या ट्वीटरवरून एक व्हिडीओ शेअर करत खळबळ उडवून दिली. यामध्ये कृषीमंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर रमी खेळताना दिसताय. यानंतर कोकाटेंवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा अधिवेशातील सभागृहात रमी खेळत असल्याचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या ट्वीटरवरून हा व्हिडीओ शेअर केला होता. यानंतर विरोधकांनी कोकाटेंना चांगलंच घेरल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, ‘त्या’ व्हिडीओवर कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी स्पष्टीकरण दिलंयय.

कोणत्याही हाऊसमध्ये कोणताही गेम खेळता येत नाही कारण तिथे कॅमेरे चालू असतात. त्यामुळे मी कोणताही गेम खेळत नव्हतो. खालच्या हाऊसमध्ये काय बिझनेस सुरू आहे हे पाहण्यासाठी मोबाईल ओपन केला. मोबाईलमध्ये कोणतरी गेम डाऊन केला होता तो स्कीप करत होतो त्यावेळी तो व्हिडीओ रेकॉर्ड झाला. तो व्हिडीओ फक्त १० ते १२ सेकंदाचा आहे. त्यानंतर तो व्हिडीओ स्कीप करून खालच्या हाऊसचा बिझनेस पाहिला. तो मला बिझनेस युट्यूबवर दिसला नाही म्हणून मी फोन ठेवून दिला आणि कामकाजात सहभागी झालो, असं माणिकराव कोकाटे म्हणाले. तर हा व्हिडीओ कोणी काढला असावा, असा सवाल केला असता, कोकाटे यावर म्हणाले, कुणीही व्हिडीओ काढू द्या, त्यात आक्षेपार्ह काहीच नसल्याने मला फरक पडत नाही, असं स्पष्टपणे कोकाटे म्हणाले.

Published on: Jul 20, 2025 03:15 PM