Air India Plane Crash :  विमान दुर्घटनेत वडिलांचा मृत्यू, ओळख पटवणं कठीण, घेतले 8 महिन्याच्या बाळाचे DNA

Air India Plane Crash : विमान दुर्घटनेत वडिलांचा मृत्यू, ओळख पटवणं कठीण, घेतले 8 महिन्याच्या बाळाचे DNA

| Updated on: Jun 13, 2025 | 7:23 PM

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेने शेकडो स्वप्नांची राख रांगोळी केली. हा फक्त एक विमान अपघात नव्हता तर अनेक अपूर्ण कथांची, तुटलेल्या आशांची आणि अचानक हिरावून घेतलेल्या भविष्याची दुःखद कहाणी आहे. या दुर्घटनेने संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. तर संपूर्ण परिसर नो-मूव्हमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

अहमदाबाद विमान अपघाताची चौकशी फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून केली जात आहे. उच्च तापमानामुळे पुरावे नष्ट होण्याचा धोका आहे, ज्यामुळे वेगाने काम करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. आतापर्यंत 2o5 डीएनए नमुने घेण्यात आले आहेत.  अशातच अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेतील वडिलांच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी 8 महिन्याच्या बाळाचे डीएनए घेतल्याची माहिती समोर आली आहे. अहमदाबाद येथे झालेल्या विमान अपघातात अदनान मास्टर यांचा मृत्यू झाला. अदनान मास्टर यांचा मृतदेह पूर्णपणे जळाल्याने त्यांची ओळख पटवणं कठीण जात आहे. त्यामुळे त्यांच्या 8 महिन्याच्या बाळाचे डीएनएचे नमुणे घेण्यात आले आहे. 21 जून रोजी अदनान मास्टर यांचं आठ महिन्याचं बाळ आणि त्यांची पत्नी लंडनला जाणार होते. त्यामुळे काल ते एकटेच प्रवास करत होते.

Published on: Jun 13, 2025 07:23 PM