Imtiaz Jaleel : थोडं थांबा…चॅनलला पुरावे देतो, मग 24 तास फक्त संजय शिरसाटच… इम्तियाज जलील काय म्हणाले?

Imtiaz Jaleel : थोडं थांबा…चॅनलला पुरावे देतो, मग 24 तास फक्त संजय शिरसाटच… इम्तियाज जलील काय म्हणाले?

| Updated on: Jun 11, 2025 | 6:04 PM

इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर शिरसाटांकडूनही पलटवार करण्यात आला. असे दलाल मार्केटमध्ये भरपूर येतात, असं संजय शिरसाट म्हणाले.

छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे पाहायला मिळाले. संजय शिरसाट यांनी नियम डावलून शेंद्रा एमआयडीसीमध्ये सहा कोटींची जागी घेतली. मुलाच्या नावाने संजय शिरसाट यांनी ही जागा आहे, असं जलील म्हणाले होते.

यानंतर जलील आज म्हणाले, मी थांबणार नाही. कितीही दबाव आणला तरीही मी थांबणार नाही. संजय शिरसाट यांनी एमआयडीसीच्या जागेबाबत बोलावं, माझ्याकडे अनेक पुरावे आहेत, ते पुरावे मी तुम्हाला देईल, असं इम्तियाज जलील म्हणाले. टीव्ही ९ मराठीशी बोलताना जलील म्हणाले, तुम्हाला तुमच्या चॅनलला २४ तासांचं मटेरिअल देतो मी.. २४ तास फक्त संजय शिरसाट संजय शिरसाट हेच दाखवा.. खूप सारं आहे फक्त थोडं थांबा… जालन्यावरून जे कार्यकर्ते येताय त्यांना सांगा परत नका जाऊ… कारण उद्या परत त्यांना येण्याची वेळ येईल, असं विधान इम्तियाज जलील यांनी केलं आहे.

Published on: Jun 11, 2025 06:04 PM