Ahmedabad Plane Crash :  दुर्घटनेचं कारण आलं समोर, थ्रस्ट प्रॉब्लेम… या एका कारणामुळंच विमान कोसळलं, थ्रस्ट म्हणजे नेमकं काय?

Ahmedabad Plane Crash : दुर्घटनेचं कारण आलं समोर, थ्रस्ट प्रॉब्लेम… या एका कारणामुळंच विमान कोसळलं, थ्रस्ट म्हणजे नेमकं काय?

| Updated on: Jun 15, 2025 | 8:12 AM

अहमदाबादमध्ये विमानाचा अपघात का झाला याचं कारण आता समोर आलंय. शेवटच्या 40 सेकंदात पायलट सुमित सभरवाल यांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी कॉल दिला आणि त्यात थ्रस्टचा प्रॉब्लेम झाल्याचं सबरवाल यांनी सांगितलं.

अहमदाबादवरून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान कसं कोसळलं याचं कारण समोर आले. हे कारण आहे थ्रस्ट. अर्थात विमान हवेत उडण्यासाठी ताकदच मिळाली नाही. अहमदाबादच्या एअरपोर्टवरून विमानाचं उड्डाण होताच काही सेकंदातच पायलट सुमित सभरवाल यांनी एटीसीला मेडे अर्थात इमरजन्सी कॉल दिला. 650 फूट उंचीवरून सबरवाल यांनी मेडे मेडे मेडे असा तीन वेळा नियमाप्रमाणे कॉल दिला. नो थ्रस्ट, लूजिंग पॉवर अनएबल टू लिफ्ट म्हणजेच विमानाला वर झेपावण्यासाठी शक्ती मिळाली नाही. त्यामुळे विमानाला वर उचलता आलं नाही. त्यावर तात्काळ अहमदाबादचे एटीसीने पायलट सभरवाल यांच्याशी संपर्क साधला. पण सभरवाल यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

Plane Crash : मेडे, मेडे… विमान खाली जातंय, एअर इंडियाच्या पायलटचा असा होता शेवटचा मेसेज, Mayday म्हणजे नेमकं काय?

अन् विमान खाली कोसळलं

टेकऑफपासून 40 सेकंदात विमान कोसळल्याचं दिसत असलं तरी पायलट सभरवाल यांच्याकडून एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिलेला कॉल आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून तात्काळ झालेला संपर्क हे सारं काही अवघ्या 15 सेकंदातच झालं असावं. त्यानंतर सभरवाल यांना पुन्हा रिप्लायचा वेळच मिळाला नाही कारण तोपर्यंत विमान कोसळलेलं होतं.

थ्रस्ट म्हणजे काय?

आता विमानाला थ्रस्ट न मिळाल्यामुळे अपघात झाल्याचं पायलट सबरवाल यांच्या इमरजन्सी कॉलमधून दिसतं. थ्रस्ट म्हणजे विमानाच्या इंजिनद्वारे निर्माण होणारी शक्ती. थ्रस्टद्वारे विमानाला हवेत उडण्यासाठी ताकद मिळते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बाईकला जसं अॅक्सेलेटर दिलं जातं त्याच पद्धतीनं विमानासाठी थ्रस्ट काम करतं. म्हणजेच थ्रस्टशिवाय विमान उडू शकत नाही.

Plane Crash : …अन् विमान दुर्घटनेचा LIVE व्हिडिओ बनला, अपघात शूट करणाऱ्या आर्यनच्या मित्रानं सांगितलं काय घडलं?

आता थ्रस्टमध्ये प्रॉब्लेम कशामुळे होतो तर पहिलं कारण असू शकतं इंजिना मध्ये बिघाड. टर्बाईन ब्लेड तुटणं किंवा इंधन पुरवठ्यात अडथळा निर्माण झाल्यास थ्रस्ट कमी होऊ शकतो. इंधन समस्या खराब दर्जाचे इंधन किंवा इंधन सप्लाय पाईपमध्ये बिघाड झाल्यास थ्रस्टवर परिणाम होतो.

कंट्रोल सिस्टीममध्ये बिघाड आधुनिक विमान हे इलेक्ट्रॉनिक सिस्टीमवर अवलंबून असतात. जर थ्रस्ट कंट्रोल सिस्टीम किंवा सेन्सर्समध्ये बिघाड झाल्यास इंजिन थ्रस्ट देऊ शकत नाही. खराब हवामान जास्त उंचीवर कमी हवेचा दाब किंवा अति तापमान असेल तरी थ्रस्टवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

Published on: Jun 15, 2025 08:12 AM