Plane Crash : दिल्ली ते अहमदाबाद प्रवास, अपघात होण्यापूर्वी ‘त्या’ प्रवाशाला काय जाणवलं? विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?

Plane Crash : दिल्ली ते अहमदाबाद प्रवास, अपघात होण्यापूर्वी ‘त्या’ प्रवाशाला काय जाणवलं? विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?

| Updated on: Jun 13, 2025 | 3:24 PM

अपघात होण्याआधीचा विमानातील एक व्हिडीओ प्रवाशाकडून टि्वट करण्यात आला होता. या प्रवाशाचं नाव आकाश वत्स असं असून त्याने अपघात होण्याआधी एक व्हिडीओ ट्विट केलं ज्यात त्याला काही गोष्टी असामन्य असल्याचे जाणवले होते.

एअर इंडियाचे विमान एआय १७१ हे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले आणि मोठी दुर्घटना घडली. अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या विमानाचा काल गुरूवारी दुपारी मोठा अपघात झाला. या अपघाताची वेगवेगळी माहिती समोर येत असताना अचानक आकाश वत्स या प्रवाशाचे नाव चर्चेत आले आहे. या प्रवाशाने दिल्ली ते अहमदाबाद असा विमान प्रवास केला होता. हा प्रवास करत असताना त्याला काही गोष्टी खटकल्या तर काही गोष्टी असामन्य असल्याचे जाणावले. यासंदर्भात त्याने ट्वीटही केले.

अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील एसी आणि स्क्रिनटच टीव्ही बंद आहे असी तक्रार आकाश वत्सने केली. “मी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या त्याच फ्लाइटमध्ये होतो – टेकऑफच्या सुमारे २ तास आधी. मी दिल्लीहून अहमदाबादला त्याच विमानाने आलो होतो. मला फ्लाइटमध्ये काही गोष्टी लक्षात आल्या होत्या, ज्याचा मी एक व्हिडिओ देखील बनवला होता.”, असं त्याने म्हटलंय.

Published on: Jun 13, 2025 03:20 PM