Breaking | भारतीयांना आणण्यासाठी विमानं भाडेतत्वावर घेणार, केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांची माहिती

| Updated on: Aug 17, 2021 | 7:14 PM

भारतीयांना आणण्यासाठी विमानं भाडेतत्वावर घेणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली. केंद्र सरकारच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या 1 हजार 650 लोकांनी भारतात येण्यासाठी विनंती केली आहे.

Follow us on

YouTube video player

नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर जगातील विविध देशांनी तिथे असणारे आपले नागरिक सुरक्षितपणे बाहेर काढण्यास सुरुवात केलीय. अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात केल्यानंतर भारत सरकारने तेथून भारतीय नागरिकांना सुरक्षित देशात परत आणण्यास सुरुवात केली आहे. अफगाणिस्तानमधील सर्व भारतीयांना मायदेशी परत आणणार. भारतीयांना आणण्यासाठी विमानं भाडेतत्वावर घेणार असल्याची माहिती केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली. केंद्र सरकारच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या 1 हजार 650 लोकांनी भारतात येण्यासाठी विनंती केली आहे. अफगाणमधील भारतीयांनी मोदी सरकारकडे मायदेशी परतण्याची विनंती केली आहे.