Breaking | पुण्यातल्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यात, अजित पवार-मुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा

| Updated on: Aug 07, 2021 | 7:52 PM

राज्यातील 25 जिल्ह्यात राज्य सरकारकडून शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, पुण्यात अद्यापही लेवल 3 चे निर्बंध लागू आहेत. त्याविरोधात सर्वसामान्य पुणेकरांसह, व्यापारी आणि पुण्यातील लोकप्रतिनिधींनीही आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

Follow us on

राज्यातील 25 जिल्ह्यात राज्य सरकारकडून शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, पुण्यात अद्यापही लेवल 3 चे निर्बंध लागू आहेत. त्याविरोधात सर्वसामान्य पुणेकरांसह, व्यापारी आणि पुण्यातील लोकप्रतिनिधींनीही आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहणार असल्याचं रांका यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान, पुण्यातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाली आहे. या बैठकीवेळी पुण्यातील निर्बंध शिथिल करण्यास मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लवकरच पुण्यातील निर्बंध शिथील होऊ शकतात. (Ajit Pawar and CM Uddhav thackeray discusses about relaxation in Restrictions in pune, traders can get relief)