Ladki Bhain Yojana Video : अजित पवार यांच्या ‘त्या’ विधानाचा नेमका अर्थ काय? दोषी नेमकं कोण सरकार की लाडक्या बहिणी?

Ladki Bhain Yojana Video : अजित पवार यांच्या ‘त्या’ विधानाचा नेमका अर्थ काय? दोषी नेमकं कोण सरकार की लाडक्या बहिणी?

| Updated on: Jan 23, 2025 | 5:49 PM

आधार लिंक झाल्याशिवाय लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे गेल्याचे उघड झाले आहे. मागे वेळ कमी होता त्यामुळे बहिणींचे आधार लिंक करता आले नाहीत, असं वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना मोठी कबुली दिली

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना मोठी कबुली दिल्याचे पाहायला मिळाले. ‘मागच्या वेळेला मर्यादित वेळ होता. त्यावेळी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आधार लिंक करायचे होते. मात्र वेळ कमी असल्याने ते करता आले नाही.’, असं सांगत अजित पवार यांनी म्हटलं. तर दुसरीकडे लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या किंवा निकष बाह्य लाडक्या बहिणींचे पैसे परत घेतले जाणार की नाही? यासंदर्भात चर्चा होत असताना आता राज्याच्या महिला बाल विकास मंत्री अदिती तटकरे या स्वतःच संभ्रमात आहेत. त्यांचीच रोज वेगवेगळी विधाने समोर येत आहेत आणि त्या स्वतःच योजनाबाबत संभ्रम पसरवला जात असल्याचा आरोपही करतायत. यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जर आधार कार्ड लिंक नसताना सरकारी पैसा दिला गेला तर याला जबाबदार कोण? कागदपत्र तपासण्याविनाच लाडक्या बहिणी बनवल्या तर यात दोष कुणाचा? अजित पवार म्हणतात वेळ कमी होता, म्हणजे घाई कशाची होती? सरकारची फसवणूक जर दोन्हीकडून झाली असेल तर कारवाई एकावरच होणार का? या प्रश्नांची उत्तर सरकारने देणे गरजेचे आहे.

Published on: Jan 23, 2025 05:49 PM