Sunetra Pawar : अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं का? सुनेत्रा पवार काय म्हणाल्या…
Sunetra Pawar News : अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा अद्यापही पूर्ण झालेली नाही. याबद्दल आज खासदार सुनेत्रा पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यावर त्यांनी खास उत्तर दिलं आहे.
अजित पवार यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यांच्या मुख्यमंत्री होण्याबाबत अनेक वेळा चर्चा होत असतात. असे असतानाच आता अजित पवार यांच्या पत्नी तथा खासदार सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर भाष्य केलं आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी तुमची इच्छा आहे का? असा प्रश्न माध्यम प्रतिनिधींनी केला. या प्रश्नाचे उत्तर देताना आपण नेमही चांगल्या इच्छा अपेक्षा व्यक्त करत असतो. पण शेवटी काय द्यायचं काय द्यायचं नाही हे देवाच्या हातात असतं. तेव्हा पांडुरंग नक्कीच सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. दरम्यान, राजकीय वर्तुळात या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेकांनी याला आगामी राजकीय घडामोडींची नांदी मानलं. त्यात आता सुनेत्रा पवार यांची दिलेली ही भावनिक प्रतिक्रिया अजित पवारांच्या राजकीय भविष्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
