तेढ निर्माण होईल असं कुणी बोलू नये – अजित पवार

| Updated on: May 01, 2022 | 11:44 AM

औरंगाबादेतल्या सभेला पोलिसांनी काही अटी घातल्या आहेत. त्याचे पालन संबंधितांनी करावे. म्हणजे वातावरण चांगले राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Follow us on

आज महाराष्ट्र (Maharashtra Day) दिन आहे. यशवंतराव चव्हाणांचा हा महाराष्ट्र आहे. आपण सुसंस्कृत आहोत. प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. आजच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने काहींनी सभा आयोजित केल्या असतील, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला आहे. शिवाजीनगरच्या पोलीस संचलन मैदानात (Police parade ground) समारंभ त्यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62व्या वर्धापन दिनोत्सवानिमित्त ध्वजवंदन व संचलन समारंभ पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. सभेविषयी ते म्हणाले, की कोणतीही सभा घेताना पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक असते. औरंगाबादेतल्या सभेला पोलिसांनी काही अटी घातल्या आहेत. त्याचे पालन संबंधितांनी करावे. म्हणजे वातावरण चांगले राहील, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.