Ajit Pawar | ‘सीएमच्या पाठिशी उभं राहायचं,राष्ट्रवादीची भूमिका’-tv9

Ajit Pawar | ‘सीएमच्या पाठिशी उभं राहायचं,राष्ट्रवादीची भूमिका’-tv9

| Updated on: Jun 24, 2022 | 8:30 PM

मी याच्या आधीही माझी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडली आहे. तर आम्ही राष्ट्रवादी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे राहण्यावर ठाम आहे.

मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात भूकंप आला. तर या भूकंपामुळे आता महाविकास आघाडी सरकार हे पडणार अशा चर्चांना उत आला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज यावर आपले मत पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच ते म्हणाले मी याच्या आधीही माझी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडली आहे. तर आम्ही राष्ट्रवादी म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे राहण्यावर ठाम आहे. तर आजही आम्ही यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना भेटायला जाणार असल्याचेही पत्रकार परिषदेत पवार म्हणाले. तसेच याभेटीत त्यांच्यासोबत मंत्री जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल हेदेखील असणार आहेत. दरम्यान विधीमंडळचे काही निर्णय असतील तर विधीमंडळाचे उपसभापती घेणार, अशी माहिती त्यांनी दिली.

Published on: Jun 24, 2022 08:30 PM