Ajit Pawar NCP : चाकणकरांशी वाद भोवला, रूपाली ठोंबरेंना स्टार प्रचारक यादीतून वगळलं, बघा कोणा-कोणाचा सहभाग?
राष्ट्रवादी काँग्रेसने बीएमसी निवडणुकीसाठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून, यात अनेक प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. बघा स्टार प्रचारकांची यादीत कोणा-कोणाचा समावेश?
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बीएमसी निवडणूक २०२५ साठी आपल्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पक्षाच्या अनेक दिग्गजांचा समावेश आहे. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवळ, कोकाटे, बाबासाहेब पाटील, मकरंद जाधव पाटील, दत्तात्रय भरणे, अण्णा बनसोडे, आदिती तटकरे, रुपाली चाकणकर, अमोल मिटकरी, अनिकेत तटकरे, सना मलिक आणि समीर भुजबळ या प्रमुख नेत्यांची नावे स्टार प्रचारकांच्या यादीत समाविष्ट आहेत.
विशेष म्हणजे, अमोल मिटकरी यांना स्थान देण्यात आले असले तरी, रुपाली ठोंबरे पाटील यांचे नाव मात्र यादीतून वगळण्यात आले आहे, तर रुपाली चाकणकर यांचे नाव यादीत कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
Published on: Nov 13, 2025 04:21 PM
