Dhananjay Munde Video : ‘मी अजितदादांना सांगितलं होतं की…’, पहाटेच्या शपथविधीवरून मंत्री धनंजय मुंडे यांचं मोठं वक्तव्य

Dhananjay Munde Video : ‘मी अजितदादांना सांगितलं होतं की…’, पहाटेच्या शपथविधीवरून मंत्री धनंजय मुंडे यांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Jan 19, 2025 | 2:47 PM

धनंजय मुंडे यांनी नुकतंच जाहीरपणे भाषण केले. यावेळी पहाटेच्या शपथविधीवरून भाष्य करत मोठा गौप्यस्फोट केलाय. बघा नेमकं काय म्हणाले?

शिवसेना भाजपची युती 2019 ला तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हातमिळवणी केली. यादरम्यान 23 नोव्हेंबर 2019 रोजी देवेंद्र फडणवीसांसह अजित पवारांनी सरकार स्थापन केलं होतं. यावेळी अजित पवारांनी पहाटे गुपचूप शपथ घेतली. यानंतर फक्त ८० तास चाललेल्या सरकारची चांगलीच चर्चा झाली. आता त्याच शपथविधीवरून अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी अजितदादांना सांगत होतो की तुम्ही जाऊ नका पण त्यांनी ऐकलं नाही’, असा मोठा खुलासा धनंजय मुंडे यांनी केला आहे. इतकंच नाहीतर मी अजित पवार यांना सांगितलं होतं हे षडयंत्र आहे, पण त्यांनी ऐकलं नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले. तर 2019 साली पहाटेची शपथ घेऊ नका, असे मी अजित पवार यांना सांगितले होते. त्याला सुनील तटकरे हे साक्षीदार आहेत. मात्र अजितदादांनी ते ऐकलं नाही. त्यांनी ती शपथ घेतली. पण याची शिक्षा मात्र मला मिळाली, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी खंत व्यक्ती केली. धनंजय मुंडे यांनी नुकतंच जाहीरपणे भाषण केले. त्यात हा मोठा गौप्यस्फोट केलाय.

Published on: Jan 19, 2025 02:47 PM