Beed guardian ministers video : धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरण भोवलं? बीडच्या पालकमंत्रीपदाचा पत्ता कट अन्…

Beed guardian ministers video : धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरण भोवलं? बीडच्या पालकमंत्रीपदाचा पत्ता कट अन्…

| Updated on: Jan 19, 2025 | 2:10 PM

अजित पवार यांच्याकडे आता बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून मंत्री धनंजय मुंडे यांना डच्चू देण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडे यांना भोवलं असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. कारण बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून मंत्री धनंजय मुंडे यांना डच्चू देण्यात आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे आता बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्याकडे बीड जिल्ह्यासह पुण्याच्याही पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकड गडचिरोलीचं पालकमंत्रीपद असणार आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई उपनगर आणि ठाण्याचे पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. दरम्यान, बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे न देता अजित पवार यांच्याकडे देण्यात आल्यानंतर सुनील तटकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘धनंजय मुंडे हे पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या संघटन कौशल्याचा उपयोग पक्ष नेहमीच करत आलाय. आमच्या वाटेला आठच पालकमंत्रीपदं आली होती. त्यामुळे जो निर्णय घेतलाय तो पक्षाने विचारपूर्वक घेतला आहे.’, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.

Published on: Jan 19, 2025 02:10 PM