Rupali Thombare Patil : नाकानं कांदे सोलणारे, नटरंगी नार…. रुपाली ठोंबरे पाटील यांचा रोख कुणावर? पोस्ट शेअर करत कोणाचा खरपूस समाचार?
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपल्या २ दशकांहून अधिक काळच्या राजकीय अनुभवाचा दाखला देत टीकाकारांना प्रत्युत्तर दिले. अजित दादांवरील निष्ठेचा पुनरुच्चार करत त्यांनी पक्षांतर्गत कुरबुरी, पार्थ पवारवरील आरोप, काँग्रेसची टीका आणि महायुतीतील भविष्यातील वाटचाल यावरही आपली भूमिका स्पष्ट केली.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी सोशल मीडियावर टीका करणाऱ्यांना आपल्या दोन दशकांहून अधिक काळच्या राजकीय अनुभवाचा दाखला देत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 2005 पासून आपण राजकारणात सक्रिय असून, ज्येष्ठ नेते शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केल्याचे त्यांनी सांगितले. नवीन आलेल्यांनी सल्ले देऊ नयेत, असे ठोंबरे पाटील यांनी म्हटले आहे. त्यांनी पक्षामधील काही कुरबुरींवरही चिंता व्यक्त केली, मात्र आपला संयम अजित पवार यांच्यासाठी असल्याचे स्पष्ट केले. अजित पवारांसोबत चर्चा करूनच भविष्यातील निर्णय घेणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. पार्थ पवार यांच्यावरील जमिनीच्या आरोपांवर बोलताना, हा केवळ स्टॅम्प ड्युटीशी संबंधित दिवाणी व्यवहार असून, विरोधक अनावश्यकपणे लक्ष्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी महानगरपालिका निवडणुका महायुती म्हणून लढण्याबाबत अजित पवार अंतिम निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले.
