Ajit Pawar : पायजमा सोडून लुंगीवर आलात तरी.., अजित पवारांची चंद्राराव तावरेंवर टीका
माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यंमंत्री अजित पवार आणि सहकार बचाव पॅनल प्रमुख चंद्रराव तावरे यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
वय 85 झालं तरी तुम्ही थांबायला तयार नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटलं आहे. अजित पवार यांनी चंद्राराव तावरे यांच्यावर ही टीका केली आहे. तुम्ही पायजमा सोडून लुंगीवर आलात असंही अजित पवार यांनी म्हंटलं आहे. वडीलधाऱ्यांनी पुढच्या पिढीला संधी द्यायला हवी असाही टोला अजित पवार यांनी लगावला आहे. त्यामुळे माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यंमंत्री अजित पवार आणि सहकार बचाव पॅनल प्रमुख चंद्रराव तावरे यांच्यात चांगलीच जुंपलेली बघायला मिळत आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, वय झाल्यावर कुठेतरी थांबायचं असतं. तुम्ही 85 वर्षांचे झाले तरी कुठं थांबायलाच तयार नाही. तुम्हाला तब्येत साथ देत नाही. तुम्ही पायजमा सोडून लुंगीवर आलात. वयोमानाप्रमाणे शरीर थकत असतं, अशी टीका अजित पवारांनी केली आहे.
Published on: Jun 18, 2025 06:23 PM
