राजकीय प्रतिक्रियांवरून Ajit Pawar पुन्हा भडकले

राजकीय प्रतिक्रियांवरून Ajit Pawar पुन्हा भडकले

| Edited By: | Updated on: Mar 28, 2022 | 12:52 PM

रत्नागिरी: भाजपचे खासदार सुजय विखे पाटील (sujay vikhe patil) यांनी केलेल्या टीकेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी सुजय विखेंना चांगलंच फटकारलं.

रत्नागिरी: भाजपचे खासदार सुजय विखे पाटील (sujay vikhe patil) यांनी केलेल्या टीकेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी सुजय विखेंना चांगलंच फटकारलं. ज्यांना कुणाला उद्योग नाही ते टीका टिप्पणी करतात. माझी पत्रकारांना (journalist) विनंती आहे की, असल्या गोष्टींना जास्तीचं महत्त्व देण्यापेक्षा उलट तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. मी इथे येऊन तिथल्या तिथे एवढे झटझट निर्णय घेतले. ताबडतोब तीन ते चार सचिवांशी बोलून त्यांना सूचना दिल्या आहेत. त्याला महत्त्व द्या ना, असं अजित पवार म्हणाले. ज्यांना उद्योग नाही त्यांनी आमच्यावर टीका करायची आणि आम्ही त्याला उत्तर द्यायचं. पुन्हा तुम्ही त्यांच्याकडे जायचं, अजित पवार असं म्हणाले, त्याला तुमचं उत्तर काय असं विचारायचं. यातून तुम्ही काय साधणार आहात? आणि मी काय साधणार आहे? राज्यातील जनता काय साधणार आहे? याचाही विचार करा ना, असंही अजित पवार म्हणाले.

Published on: Mar 28, 2022 12:52 PM