Ajit Pawar : मशिदीत जाऊ नका, अन्यथा..; अजित पवारांच्या किरीट सोमय्यांना स्पष्ट सूचना
Ajit Pawar Advises Kirit Somayya : अनधिकृत भोंग्याच्या संदर्भात अजित पवार यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. यावेळी अजित पवारांनी किरीट सोमय्यांना महत्वाच्या सूचना केल्या.
किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हंटलं आहे. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्याच्या बैठकीत अजित पवार यांनी या सूचना केल्या. सोमय्यांच्या मशिदीत जाण्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असंही त्यांनी म्हंटलं. सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीत अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं आहे.
किरीट सोमय्यांनी मशिदीवरील भोंग्यांविरोधात मोहीम उघडलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये असं स्पष्ट शब्दात अजित पवारांनी सांगितलं आहे. तसंच अजित पवारांकडून पोलीस आयुक्त आणि पोलीस महासंचालक यांना नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले मात्र कुठेही चुकीच्या पद्धतीने कारवाई नको असं स्पष्ट शब्दात सांगितलं. यावेळी बैठकीत पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी उच्च न्यायालयाने घातलेली ४६ ते ५६ डेसिबल आवाज मर्यादा पालन होऊच शकत नाही याच प्रात्याक्षिक दाखवलं. बैठकीत बसलेल्या लोकांचा आवाज देखील ४६ डेसिबल पेक्षा जास्त आहे. याचं प्रॅक्टिकल देवेन भारती यांनी अजित पवारांना दाखवलं.
