माझ्या नादी लागू नको… अजित पवारांची दमदाटी कुणावर? सुप्रिया सुळेंचा पलटवार काय?

| Updated on: May 12, 2024 | 11:36 AM

अजित पवार यांनी निलेश लंके यांना दम दिल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, निलेश लंके यांनी कुणी दम दिला तर सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील, असा पलटवार सुप्रिया सुळेंनी केलाय. तर दुसरीकडे पुण्यातील चाकण येथेही अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना बंदोबस्त करण्याचा इशारा दिला

शरद पवारांच्या तीन आमदारांना अजित पवार यांनी दम दिला आहे. अमोल कोल्हे, बजरंग सोनवणे आणि निलेश लंके यांचा थेट बंदोबस्त करणार असल्याचा इशारा अजित पवार यांनी दिला. अजित पवार यांनी निलेश लंके यांना दम दिल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, निलेश लंके यांनी कुणी दम दिला तर सुप्रिया सुळे ढाल बनून उभी राहील, असा पलटवार सुप्रिया सुळेंनी केलाय. तर दुसरीकडे पुण्यातील चाकण येथेही अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना बंदोबस्त करण्याचा इशारा दिला. बिबट्याच्या समोर कोल्ह्याला सोडल्याची भाषा करत अमोल कोल्हेंवर निशाणा साधला. अजित पवार यांनी बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्याविरोधात उभ्या असलेल्या बजरंग सोनवणे यांच्यावर देखील हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: May 12, 2024 11:36 AM