Devendra Fadnavis : दानवेंच्या निरोप समारंभात फडणवीसांची शाल-पागोट्यातून टोलेबाजी

Devendra Fadnavis : दानवेंच्या निरोप समारंभात फडणवीसांची शाल-पागोट्यातून टोलेबाजी

| Updated on: Jul 16, 2025 | 4:22 PM

अंबादास दानवे यांच्या विरोधी पक्ष नेतेपदाचा कार्यकाळ आज संपत आहे. त्यानिमित्त विधान परिषदेत त्यांचा निरोप समारंभ पार पडला.

शिवसेना उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ आज संपत आहे. यानिमित्ताने विधान परिषदेत त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला आहे. दानवे हे ऑगस्ट 2019 मध्ये छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले होते. अंबादास दानवे यांच्या या निरोप समारंभाच्या भाषणावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टोलेबाजी बघायला मिळाली आहे.

निरोप समारंभात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘जोपर्यंत राहुल गांधी युवा नेते राहू शकतात, तोपर्यंत आपण दोघेही युवा राहू शकतो. दानवे यांची राजकीय कारकीर्द भाजपमधून सुरू झाली होती, त्यानंतर शिवसेनेत प्रवेश करून त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. फडणवीस म्हणाले, दानवे यांनी पत्रकारितेचा अभ्यास केला, त्यामुळे त्यांच्याकडून बातम्या संकलित होण्याची अपेक्षा होती, पण त्यांनी बातम्या निर्माण केल्या. त्यांच्यामुळे सभागृहाला एक चांगला नेता मिळाला. भाजपच्या मुशीत तयार झाल्याने त्यांच्यात चिकाटी आणि संघटन कौशल्य दिसून येते.

फडणवीस पुढे म्हणाले, दानवे यांना सामान्य लोकांच्या प्रश्नांची जाण आहे. 2019 मध्ये त्यांच्या निवडणुकीवेळी आम्ही सर्व एकत्र होतो आणि त्यांना पाठिंबा दिला होता. आता त्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळही संपेल. त्यामुळे अनिल परब यांनी आता तयारी ठेवावी, असा टोला त्यांनी परब यांना लगावला.

Published on: Jul 16, 2025 04:22 PM