‘राऊत यांना ब्लॅकमेल करण्यासाठीच सगळ्या यंत्रणाचा केंद्रासह राज्याकडून वापर’; शिवसेना नेत्याचा हल्लाबोल
राऊत यांच्याबाबत पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ED ने न्यायालयात जामिन रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यावरून सध्या ठाकरे गट आक्रमक झाला आहे. यावरून विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केंद्रासह राज्य सरकारवर टीका केली आहे.
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याबाबत पत्राचाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ED ने न्यायालयात जामिन रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यावरून सध्या ठाकरे गट आक्रमक झाला आहे. यावरून विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केंद्रासह राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यांनी हे सगळ फक्त राऊत याच्यावर दबाव आणण्यासह त्यांना ब्लॅकमेलिंग करण्यासाठी ईडीच्या मार्फत प्रयत्न केले जात आहेत. तर यात केंद्राचा आणि राज्याचा मोठा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर राऊत याच्याआधी या सगळ्या चौकशीला घाबरलेले नाही आणि येणाऱ्या काळातही ते काही घाबरणार नाही. कारण या सगळ्या गोष्टी राजकीय हेतून होत आहेत अशी टीका त्यांनी केली आहे. तर जामीन देताना न्यायालयाने यावरून ईडीला सुनावलं होतं. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी त्यांचा जामीन रद्द होणार नाही असाही दावा त्यांनी केला आहे.
