राजापूरातील बारसू गावातील ग्रामस्थांची प्रकल्पाविरोधात निदर्शनं

| Updated on: Mar 30, 2022 | 12:56 PM

रिफायनरी प्रकल्प करण्यास नाणारवासियांनी (Nanar Refinery Project) विरोध केला होता. प्रकल्पाच्या विरोधात नाणारवासियांनी मोठं आंदोलन उभारलं होतं.

Follow us on

रिफायनरी प्रकल्प करण्यास नाणारवासियांनी (Nanar Refinery Project) विरोध केला होता. प्रकल्पाच्या विरोधात नाणारवासियांनी मोठं आंदोलन उभारलं होतं. त्यानंतर हा प्रकल्प कोकणातच इतर ठिकाणी करण्यासाठी जागेची शोधाशोध सुरू झाली होती. त्यानुसार बारसू (Basur)आणि सोलगाव (solgaon) या दोन गावातील जागांचा पर्याय सांगण्यात आला.बारसूत रिफायनरी प्रकल्प होत असल्याने त्याला स्थानिकांनी विरोध केला आहे. आज स्थानिक नागरिकांनी जोरदार निदर्शने करत बारसूत होणाऱ्या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. मुख्यमंत्र्यांनी बारसूत प्रकल्प व्हावा म्हणून पंतप्रधानांना 12 जानेवारीला पत्रं दिलं आहे.