महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बदल होणार? शहा-फडणवीसांमध्ये 25 मिनिटं खलबतं, काय झाली चर्चा?

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बदल होणार? शहा-फडणवीसांमध्ये 25 मिनिटं खलबतं, काय झाली चर्चा?

| Updated on: Jul 25, 2025 | 2:55 PM

महायुतीतील इतर घटक पक्ष आहेत त्यातील मंत्र्यांकडून होणाऱ्या चुकांमुळे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे, अशी गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्याच्या राजकीय वर्तुळात अशी चर्चा सुरू होती. त्या अनुषंगाने अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील चर्चा महत्त्वाची मानली जात आहे.

राजधानी दिल्लीतून एक मोठी माहिती समोर येत आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दिल्लीत जवळपास २५ मिनिटं बैठक झाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीतील संसद भवनात केंद्रीय मंत्री अमित शाहांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या दोन दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अमित शाहांची भेट घेतली. फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यात महत्त्वाच्या भेटीगाठी सुरू आहेत. यासोबतच अनेक महत्त्वाच्या बैठका मुख्यमंत्री घेताना दिसताय. राज्यातील राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यातील मंत्र्यांवर झालेले आरोप आणि कथित हनी ट्रॅपचं प्रकरण असेल किंवा कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचं वादग्रस्त विधान असेल त्यामुळे राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Published on: Jul 25, 2025 02:55 PM