Farmer Aid : शहांच्या दौऱ्यात अतिवृष्टी मदतवरून फडणवीस-पवारांमध्ये जुंपली, राज्यात राजकीय रणकंदन सुरू

Farmer Aid : शहांच्या दौऱ्यात अतिवृष्टी मदतवरून फडणवीस-पवारांमध्ये जुंपली, राज्यात राजकीय रणकंदन सुरू

| Updated on: Oct 06, 2025 | 10:31 AM

महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मुद्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शरद पवारांनी राज्य सरकारवर केंद्राकडे प्रस्ताव न पाठवल्याचा आरोप केला, तर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आरशात पाहण्याचा सल्ला दिला. अमित शाहंच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महायुतीच्या नेत्यांनी केंद्राकडून मदतीची मागणी केली असून शाह यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकरी सध्या मदतीच्या प्रतीक्षेत असतानाच राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी राज्य सरकारने केंद्राकडे मदतीसाठी प्रस्तावच पाठवला नसल्याचा आरोप केला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले. प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या विरोधकांनी आत्मचिंतन करावे, असे फडणवीस म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शाह यांच्याकडे केंद्राकडून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची मागणी केली. अमित शाह यांनी केंद्र सरकार मदत करेल, असे आश्वासन दिले आहे. या भेटीनंतर राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी भरीव मदत देण्याचा निर्णय घेईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. साखर कारखान्यांच्या नफ्यातून शेतकऱ्यांना मदत करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरूनही वाद सुरू आहे. शरद पवारांनी याला सक्तीची वसुली म्हटले, तर फडणवीसांनी हे कारखान्यांच्या नफ्यातून असल्याचा खुलासा करत शेतकाऱ्याचा काटा मारणाऱ्यांना इशारा दिला.

Published on: Oct 06, 2025 10:31 AM