Amol Kolhe | अमोल कोल्हेंनी दिला महाराजांच्या पेहरावात साक्षीसाठी अनमोल संदेश

Amol Kolhe | अमोल कोल्हेंनी दिला महाराजांच्या पेहरावात साक्षीसाठी अनमोल संदेश

| Edited By: | Updated on: Aug 04, 2021 | 10:30 PM

मंत्री एकनाथ शिंदे, महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेकांनी साक्षीच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. अशावेळी खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी खास छत्रपती शिवाजी महाराज यांचा पेहराव परिधान करत साक्षीला नवं बळ, धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

महाडच्या पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावात जेव्हा दरड कोसळली तेव्हा समोरच्या घरातलं 2 महिन्याचं बाळ वाचवण्यासाठी गेलेल्या क्रीडापटू साक्षी दाभेकरला आपला एक पाय गमवावा लागला आहे. साक्षीने त्या बाळाला तर वाचवलं मात्र ती एका पायानं दिव्यांग बनली. मात्र, आता तिला पुन्हा एकदा दोन्ही पायांवर उभं करण्यासाठी अनेक हात सरसावले आहेत. मंत्री एकनाथ शिंदे, महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह अनेकांनी साक्षीच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. अशावेळी खासदार आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी खास छत्रपती शिवाजी महाराज यांचा पेहराव परिधान करत साक्षीला नवं बळ, धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.