परमबीर सिंह भाजपचे एजंट? मविआ कोसळण्यासाठी कोणी केले प्रयत्न? अमोल मिटकरी यांच्या निशाण्यावर कोण?

| Updated on: Aug 02, 2023 | 9:22 AM

परमबीर सिंह यांच्यावरील कारवाई मागे घेतल्यामुळे विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी परमबीर सिंह भाजपचे एजंट होते का? असो खोचक सवाल केला आहे.

Follow us on

अकोला: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावरील निलंबनाची कारवाई शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेतली आहे. हा परमबीर सिंह यांच्यासाठी मोठा दिलासा आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या काळात परमबीर सिंह यांचं निलंबन करण्यात आलं होतं. परमबीर सिंह यांच्यामुळे अनिल देशमुख यांना तत्कालीन गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली अनिल देशमुख हे बराच काळ तुरुंगातही होते. आता परमबीर सिंह यांच्यावरील कारवाई मागे घेतल्यामुळे विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘परमबीर सिंह भाजपचे एजंट होते का ? परमबीर सिंह भाजपचे कार्यकर्ते म्हणून काम करत होते का? त्यामुळे बक्षिस म्हणून त्यांना पुन्हा रुजू करून घेतलं का?’, असा सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे. तसेच ‘महाविकास आघाडी सरकार कोसळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी प्रामाणिक प्रयत्न केले होते’, असा आरोप देखील अमोल मिटकरी यांनी केला आहे.