निवडणुकीत ‘जय श्रीराम’ घोषणाबाजीचा फायदा होणार? नवनीत राणांनी स्पष्टच दिलं उत्तर

| Updated on: Apr 24, 2024 | 3:13 PM

'आज अमित शाहांची अमरावतीत सभा आहे. तर भाजपचं कमळ फुलवण्याची जबाबदारी अमरावतीकरांची आहे. त्यामुळे मला जास्त काहीच करायचं नाही, लोकांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रामराम आणि मोदींचे कार्य पोहोचवायची आहेत', नवनीत राणा काय म्हणाल्या?

Follow us on

‘देवाच्या नावाचा फायदा, नुकसान मी पाहत नाही. माझा धर्म आणि कर्तव्य मला एकच शिकवतंय की, देवाचं नाव, देवाशी माझं एक वेगळं नातं आहे. तो विषय माझ्या जीवनात वेगळा आहे. त्यामुळे देवाचं नाव, त्याचा फायदा नुकसान हे स्वार्थी लोकांचा विषय आहे.’, असं भाजप उमेदवार नवनीत राणा म्हणाल्या. जय श्री राम या घोषणेचा या लोकसभा निवडणुकीत किती फायदा होणार? असा सवाल नवनीत राणा यांना केला असता त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली. तर पुढे त्या असंही म्हणाल्या, आज अमित शाहांची अमरावतीत सभा आहे. तर भाजपचं कमळ फुलवण्याची जबाबदारी अमरावतीकरांची आहे. त्यामुळे मला जास्त काहीच करायचं नाही, लोकांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रामराम आणि मोदींचे कार्य पोहोचवायची आहेत, असे नवनीत राणा यांनी म्हटले.