आम्ही बाबासाहेबांच्या कायद्याला मानतो, अन्यथा राज्यपालांवर दबाव आला असता: आनंद शिंदे

| Updated on: Sep 02, 2021 | 12:26 PM

बुधवारी सांयकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्या भेटीत विधानपरिषदेच्या बारा सदस्यांबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

Follow us on

मुंबई: महाराष्ट्रात विधानपरिषदेच्या 12 जागांवरील राज्यपाल नामनियुक्त सदस्यांचा प्रश्न सध्या गाजतोय. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याची चर्चा आहे. आनंद शिंदे यांनी मुंबईत यासंदर्भात संवाद साधला. राज्यपाल संविधानाचा विचार करतील. संविधानात तरतूद असल्यानं राज्यपाल सुरक्षित आहेत अन्यथा त्यांच्यावर समाजाचा दबाव आला असता. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रभाव असल्यानं कायदा मोडू शकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही लोकांचा प्रवेश झाला. अजित पवार यांनी राज्यपालांना विनंती केली असल्याची माहिती दिली. त्यामुळे बारा आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न सुटेल, अशी माहिती आनंद शिंदे यांनी दिली. बुधवारी सांयकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्या भेटीत विधानपरिषदेच्या बारा सदस्यांबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.