आमचे वकील ‘हे’ महत्वाचे मुद्दे मांडणार; सुनावणी सुरु होण्याआधी अनिल देसाईंनी महत्वाचे मुद्दे सांगितले…

आमचे वकील ‘हे’ महत्वाचे मुद्दे मांडणार; सुनावणी सुरु होण्याआधी अनिल देसाईंनी महत्वाचे मुद्दे सांगितले…

| Edited By: | Updated on: Feb 16, 2023 | 10:56 AM

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होतेय. या सुनावणी आधी शिवसेना ठाकरेगटाचे नेते अनिल देसाई यांनी महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत. पाहा ते काय म्हणालेत...

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होतेय. राज्यातील राजकीय पेचप्रसंगावरील सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे. दोन दिवसाच्या सुनावणीनंतर आज पुन्हा सुनावणी होतेय. या सुनावणी आधी शिवसेना ठाकरेगटाचे नेते अनिल देसाई यांनी महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत. “सलग तिसऱ्या दिवशी आज सुनावणी होणार आहे. नबाम रिबिया प्रकरण महाराष्ट्राच्या केसला लागू होतं का? याबाबत आमच्या वकिलांनी बाजू मांडली आहे. महाराष्ट्र आणि अरुणाचल प्रदेश मध्ये फरक आहे हे आम्ही सांगितलं आहे. सरन्यायाधीशांनी पण याबाबत काही विसंगती व्यक्त केली आहे. त्यामुळे आज यापुढे कोणते मुद्दे मांडले जाणार, त्यावर न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं असेल. आम्हाला विश्वास आहे की, निर्णय आमच्याच बाजूने लागणार, असं अनिल देसाई म्हणालेत.

Published on: Feb 16, 2023 10:56 AM