Vaishnavi Hagawane : आणखी एक मोठा पुरावा समोर, वैष्णवीच्या वडिलांकडून 1.5 लाख उकळले, हगवणेंनी मामीच्या नावे…

Vaishnavi Hagawane : आणखी एक मोठा पुरावा समोर, वैष्णवीच्या वडिलांकडून 1.5 लाख उकळले, हगवणेंनी मामीच्या नावे…

| Updated on: May 31, 2025 | 5:19 PM

वैष्णवी हगवणे प्रकरणी पोलिसांच्या तपासातून नव-नवी माहिती समोर येत आहे. यातून हगवणे कुटुंबांच्या कारनाम्यांची मालिकाच सुरू असल्याचे उघड होत आहे. अशातच अंजली दमानियांनी खळबळजनक दावा केलाय.

वैष्णवी हगवणे प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. वैष्णवीच्या वडिलांकडून पूनम जालिंदर सुपेकरांच्या नावे १ लाख रूपयांची रक्कम हगवणे यांनी घेतल्याची मोठी माहिती समोर आली आहे. वैष्णवी आणि शंशाकच्या लग्नातील रुखवत तुम्ही करू नका, शशांकच्या मामी करतील, असं हगवणे कुटुंबांकडून वैष्णवीच्या माहेरच्यांना सांगण्यात आलं आणि त्याचे एक लाख रूपये वैष्णवीच्या सासरच्यांनी लाटले. दमानिया यांनी ट्वीट करत हा घ्या एक मोठा पुरावा असे म्हणत हा दावा केलाय. वैष्णवीच्या वडिलांकडून १ लाख रुपये पूनम जालिंदर सुपेकर यांच्या नावाने घेतले. तुम्ही रुखवत नका करू, मामी (पूनम जालिंदर सुपेकर) सुंदर रूखवत करतील असे सांगून १ लाखाचा चेक आणि ५०,००० रोख हे हगवणे कुटुंबाने वैष्णवीच्या माहेच्यांकडून वसूल केले, असे दमानियांनी पुरावा दाखतव सांगितले. तर दूरच्या नातलगांना कोणी पैसे द्यायला सांगतात का? असा सवालही त्यांनी केला.

Published on: May 31, 2025 05:19 PM