Anjali Damania Video : खोक्याचं घरं अज्ञातांनी पेटवलं अन् वनविभागाचं घरावर बुलडोझर, दमानियांकडून खंत व्यक्त; ‘…चूक काय, खूप वाईट वाटलं’

Anjali Damania Video : खोक्याचं घरं अज्ञातांनी पेटवलं अन् वनविभागाचं घरावर बुलडोझर, दमानियांकडून खंत व्यक्त; ‘…चूक काय, खूप वाईट वाटलं’

| Updated on: Mar 14, 2025 | 11:57 AM

गेल्या काही दिवसांपासून खोक्याचे कारनामे समोर आले आणि खोक्याचं घर ही वनविभागाच्या जागेवर बेकायदेशीरपणे असल्याचं समजलं आणि त्यानंतर वनविभागाने पोलिसांच्या मदतीने खोक्याचं घर जमीनदोस्त केलं आहे

सतीश भोसले उर्फ खोक्या यांच्या घरावर काल वनविभागाकडून कारवाई करण्यात आली. यानंतर खोक्या भोसलेचं काल रात्री काही अज्ञातांनी घर पेटवल्याचा आरोप केला जात आहे. नुसतं घरंच पेटवलं नाही तर १५ ते २० जणांनी मारहाण केल्याचा आरोपही खोक्याच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सतीश भोसले उर्फ खोक्या हा पोलिसांना गुगांरा देऊन फरार होता मात्र त्याला उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्या ताबा बीड पोलिसांनी घेतला. त्यापूर्वी त्याला विमानाने मुंबईत आणलं होतं. सध्या त्याची शिरूर येथे वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आहे. दरम्यान, काल वनविभागाकडून कारवाई करण्यात आल्यानंतर अज्ञातांकडून खोक्याचं घर पेटवल्याने कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्वीट करत भाष्य केले आहे. सतीश भोसलेचं घर का जाळलं? खूप खूप वाईट वाटलं. किती क्रूर. परिवाराची काय चूक? दुसऱ्याच्या घरावर बुलडोझर चालवणं चुकीचं असल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. तर सतीशने कायदा हातात घेऊन ज्या चुका केल्या, त्यासाठी कायद्याने शिक्षा द्या पण घर का जाळलं ? हे योग्य नसल्याचे म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

Published on: Mar 14, 2025 11:57 AM