Anjali Damania : …तेव्हा अजित पवार सुटले आता मी सुटू देणार नाही, दमानियांचा निर्धार पक्का, काय दिला इशारा?
पार्थ पवार यांच्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा पाठपुरावा करणार असून, ३०० कोटींच्या खरेदीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकतेच अमेरिकेत असताना आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची माहिती दिली. तुमच्या जीवाला धोका आहे, त्यांचा गेम करायचा आहे अशा शब्दांत त्यांना वरिष्ठ सूत्रांकडून कळवण्यात आले होते. या धमक्यांना न जुमानता दमानिया यांनी आता हेड ऑन बॅटल देण्याचा निर्धार केला आहे.
यापूर्वी अजित पवार हे सिंचन घोटाळा, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक घोटाळा आणि जरंडेश्वर कारखाना घोटाळ्यातून आरोपी सुटले होते, पण यावेळी त्यांना सुटू देणार नाही, असा निर्धार दमानिया यांनी व्यक्त केला. दिस विल बी अ बॅटल टू फिनिश अशा शब्दात त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला. शासनाने जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी ४२ कोटी रुपये भरण्यास सांगितल्याच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ज्या कंपनीकडे पैसे नाहीत, ती कंपनी ४२ कोटी कुठून आणणार आणि असतील तर ते पैसे कुठून आले, याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल, अशी मागणी त्यांनी केली. अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत, शेतकऱ्यांबद्दल बोलताना माफी लागते, फुकट लागते असे म्हणणारे आता स्वतःच्या मुलाच्या कथित गैरव्यवहारावर बोलत नाहीत, असा आरोप त्यांनी केला. पार्थ पवार आणि अजित पवार यांना प्रत्येक पैशाचा हिशोब द्यावा लागेल, असेही त्या म्हणाल्या.
