नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये माथाडी कामगारांचं आंदोलन

नवी मुंबईच्या APMC मार्केटमध्ये माथाडी कामगारांचं आंदोलन

| Edited By: | Updated on: Nov 16, 2021 | 12:21 PM

कांदा-बटाटा मार्केटमधील माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन केले आहे. एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमधील माथाडी कामगारांनी आज पुन्हा काम बंद आंदोलन पुकारले आहे.

नवी मुंबई : कांदा-बटाटा मार्केटमधील माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन केले आहे. एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमधील माथाडी कामगारांनी आज पुन्हा काम बंद आंदोलन पुकारले आहे. वारंवार पत्र व्यवहार करुनही व्यापारी 50 किलो पेक्षा जास्त माल मागवतात. कित्येक वेळा सर्व पदाधिकारी, नेते आणि कामगार यांच्या बैठक होऊन सुद्धा व्यपारी जास्त माल मागवतात. जोपर्यंत 50 किलोपेक्षा कमी माल बाजार आवारात येणार नाही तोपर्यंत माथाडी कामगार माल खाली करणार नाही, असा पवित्राच माथाडी कामगारांनी घेतला आहे. सकाळपासून कांदा बटाटा मार्केट बंद करुन माथाडी कामगार आंदोलन सुरू केला आहे.