आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज 16 फेब्रुवारी पासून भरता येणार, शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती

आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठीचे अर्ज 16 फेब्रुवारी पासून भरता येणार, शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती

| Edited By: | Updated on: Feb 01, 2022 | 10:55 PM

शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक (Time Table) प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार 01 फेब्रुवारी 2022 पासून पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले होते. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव आरटीई पोर्टलवर सदरचे अर्ज 01 फेब्रुवारी 2022 ऐवजी बुधवार 16 फेब्रुवारी 2022 पासून भरता येतील.

मुंबई : शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक (Time Table) प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार 01 फेब्रुवारी 2022 पासून पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कळविण्यात आले होते. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव आरटीई पोर्टलवर सदरचे अर्ज 01 फेब्रुवारी 2022 ऐवजी बुधवार 16 फेब्रुवारी 2022 पासून भरता येतील, संबंधितांनी या बदलाची नोंद घेऊन अर्ज दाखल करावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी केले आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम (Right to Education Act) 2009 कलम 12(1) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर 25 टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुले व मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. याबाबत आरटीई पोर्टलवर सविस्तर सूचना यथावकाश देण्यात येतील. पोर्टलवरील वेळोवेळी दिलेल्या सूचनांची सर्व संबंधितांती नोंद घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, असेही शिक्षक संचालक (प्राथमिक) दिनकर टेमकर यांनी याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.