Pahalgam Attack : ‘हिंदू हो क्या?’, हल्ल्याच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी विचारलं, जालन्यातील पर्यटकांचा थेट NIA ला ई-मेल
'२० तारखेला श्रीनगरला होतो आणि २१ तारखेला आम्ही श्रीनगरवरून पहलगामसाठी निघालो. एक दीड तासांनी आम्ही पहलगामला पोहोचलो. बैसरन व्हॅली फार उंचावर असल्याने माझ्या आई-वडिलांना न नेता मी एकटा घोडा घेऊन गेलो.', असे आदर्श राऊत यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीर येथील पहलगाम येथे गेल्या आठवड्यापूर्वी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यासंदर्भात आणखी एक माहिती समोर आली आहे. जालन्यातील पर्यटक हा जम्मू काश्मीर येथे फिरण्यास गेला होता. यावेळी त्याला आलेला एक अनुभल त्याने टीव्ही ९ शी बोलताना शेअर केला आहे. ‘हिंदू हो क्या?’, पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या आदल्या दिवशी दहशतवाद्यांनी विचारलं, असल्याचा धक्कादायक दावा जालन्यातील या पर्यटकाने केला आहे. या पर्यटकाचे नाव आदर्श राऊत असे असल्याची माहिती मिळतेय. तर यासंदर्भात आदर्श राऊत याने या घडलेल्या घटनेसंदर्भात एक मेलच एनआयएला पाठवला आहे. या मेलमध्ये पहलगाम हल्ल्याच्या आदल्यादिवशी दहशतवाद्यांशी संवाद झाल्याचा दावा आदर्श राऊत यांनी केला आहे. ‘हिंदू हो क्या?’ असाच सवाल दहशतवाद्यांनी हल्ल्याच्या आदल्या दिवशी विचारल्याचा दावा जालन्यातील पर्यटकाने केला आहे. तर द एका स्केचवरून दहशतवाद्याला ओळखल्याचा दावाही आदर्श राऊत यांनी केला आहे.
