Lionel Messis India Visit : अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात… कसा असणार 3 दिवसीय दौरा?

| Updated on: Dec 13, 2025 | 12:31 PM

अर्जेंटिनाचा सुपरहिरो आणि फुटबॉल प्लेअर लियोनल मेस्सी हा पुढील तीन दिवस भारत दौऱ्यावर असणार आहे. लियोनल मेस्सीच्या या तीन दिवसीय भारत दौऱ्याला गोट इंडिया टूर असं नाव देण्यात आलं आहे.

अर्जेंटिनाचा सुपरहिरो लियोनल मेस्सी भारतात दाखल होणार आहे. उद्या 14 डिसेंबरला दुपारी 3:30 वाजता मुंबईतल्या सीसीआय मधील पॅडल कप स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. चार वाजता मेस्सी सेलिब्रिटी फुटबॉल सामना खेळणार असून तासाभरानंतर पाच वाजता वानखेडे स्टेडियम वरील कार्यक्रम आणि चॅरिटी फॅशन शो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे त्यात मेस्सीचा सहभाग असणार आहे. दरम्यान, 15 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट आणि चर्चा होईल. दुपारी दीड वाजता अरुण जेटली स्टेडियम मधील कार्यक्रमात सहभागी होणार असून या दौऱ्याला गोट इंडिया टूर असं नाव दिलं गेल आहे. मेस्सी मुंबईमध्ये होणाऱ्या फॅशन शो मध्ये सुद्धा सुमारे 45 मिनिटं सहभागी होणार आहे. लियोनल मेस्सी जवळपास 14 वर्षांपूर्वी म्हणजे 2011 भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळीही चहात्यांनी मेस्सीचा प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केलं होतं.

Published on: Dec 13, 2025 12:31 PM