Bhaiyyaji Joshi Video : संघाच्या भैय्याजी जोशींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून विधीमंडळात राडा, सत्ताधारी-विरोधक भिडले
भैय्याजी जोशींनी मराठी भाषेसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात एकच गदारोळ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय वर्तुळातील काही नेते मंडळी भैय्याजी जोशींनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपवरच निशाणा साधताय
‘मुंबईत येणाऱ्यांना मराठी शिकलंच पाहिजे असं नाही’. या आरएसएसच्या भैय्याजी जोशींच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर विरोधक आक्रमक झाले. जोशीबुवांनी काड्या करू नयेत, असं म्हणत राज ठाकरेंनी भैय्याजी जोशींवर निशाणा साधला. तर महाराष्ट्राची भाषा मराठीच असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठणकावून सांगितलं. भैय्याजी जोशींच्या वादग्रस्त वक्तव्याने विधीमंडळात जोरदार गदारोळ झाला. घाटकोपरची भाषा गुजराती आहे. मराठी शिकलं पाहिजे असं नाही, असं वादग्रस्त वक्तव्य भैय्याजी जोशींनी घाटकोपर मधल्या एका कार्यक्रमात केलं. दरम्यान, भैय्याजी जोशींच्या या वक्तव्यानंतर भास्कर जाधवांनी विधानसभेत सरकारची भूमिका काय? असा सवाल केला. दुसरीकडे भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे बोलायला उभे राहिले. यावेळी नितेश राणे आणि आदित्य ठाकरेंमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर विधानसभेचं कामकाज तहकूब कराव लागलं. विधानपरिषदेतही भैय्याजी जोशींच्या वक्तव्यावरून अनिल परबांनी सरकारला सवाल केले. त्यावेळीही जोरदार गदारोळ झाला. त्यामुळे विधानपरिषदेचंही कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब झालं. बघा नेमकं काय-काय घडलं?
