Special Report | औरंगाबाद ते मुंबई, MIM ची तिरंगा रॅली, ओवेसी आणि जलील यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

Special Report | औरंगाबाद ते मुंबई, MIM ची तिरंगा रॅली, ओवेसी आणि जलील यांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

| Edited By: | Updated on: Dec 11, 2021 | 11:26 PM

मुस्लिम आरक्षण आणि वक्फ बोर्डाच्या जमिनीच्या मुद्द्यावरुन खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात आज एमआयएमकडून तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी इम्तियाज जलील आणि एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार तोफ डागली. इतकंच नाही तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात विधानसभेबाहेर धरणं आंदोलनाचा इशाराच यावेळी जलील यांनी दिलाय.

कुठे आहे 93 हजार एकर जमीन? कुणी कुणाला वाटली, कुणी कुणाला विकली? 8 महिने झाले मला महाराष्ट्र वक्फ बोर्डाचा सदस्य होऊन. या काळात 9 एफआयआर दाखल केले आहेत. जे विचार करत होते की आम्हाला कोण रोखू शकतं. आम्ही सर्वांना विकत घेऊ शकतो. त्यांना काय माहिती बाजारात कुत्र्यांची पिल्लं विकली जातात, आम्ही नाही. बाजारात सिंह विकले जात नाहीत, त्यातील एक स्टेजवर आहे, असं सांगत जलील यांनी विरोधकांना थेट इशारा दिलाय.

तर आमची रॅली होणार म्हटल्यावर मुंबईत 144 कलम लागू केलं. आता राहुल गांधी मुंबईत येणार आहेत. तेव्हाही 144 कलम लावणार की त्यांचं फुलांनी स्वागत करणार आहात? असा सवाल करतानाच राहुल गांधी येतील तेव्हा ओमिक्रॉनची चर्चा होणार नाही. केवळ सत्तेची चर्चा होईल. आमच्या रॅलीवेळी मात्र ओमिक्रॉनची चर्चा होते, असा हल्ला ओवैसी यांनी चढवला.