Asaduddin Owaisi : नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले…

Asaduddin Owaisi : नव्या वक्फ कायद्याला तूर्तास स्थगिती, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले…

| Updated on: Apr 17, 2025 | 3:39 PM

वक्फ सुधारणा विधेयकावर सत्तर पेक्षा अधिक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. पाच याचिकांवर सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. नव्या वक्फ कायद्यासंदर्भातील दोन कलमांना सुप्रीम कोर्टाकडून तुर्तास स्थिगिती देण्यात आली आहे. 

नव्या वक्फ कायद्याला सुप्रीम कोर्टाकडून तूर्तास स्थगिती देण्यास आली असून केंद्र सरकारने जैसे थेच परिस्थिती ठेवावी, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत.  एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आताच सुप्रीम कोर्टाने नव्या वक्फ कायद्यासंदर्भात आदेश दिला आहे. सरकारने पुढील सुनावणीपर्यंत केंद्रीय वक्फ बोर्ड, राज्य वक्फ बोर्डावर कोणतीही नवी नियुक्ती करू नये, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. यासह तूर्तास वक्फ बाय युजरच्या माध्यमातून वक्फ करण्यात आलेल्या संपत्तीतही कोणता बदल करू नये, असे न्यायालयाने म्हटले असल्याचे असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितलं. पुढे ते असेही म्हणाले की, राज्य वक्फ बोर्ड आणि परिषदेवर नेमणुका करण्यावर स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही वक्फ कायद्याला असंवैधानिक मानतो, असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलंय.

Published on: Apr 17, 2025 03:39 PM