Ashadhi Ekadashi 2021| मानाच्या पालख्यांची मंदिर प्रदक्षिणेला सुरुवात, चंद्रभागा नदी किनारी शुकशुकाट

Ashadhi Ekadashi 2021| मानाच्या पालख्यांची मंदिर प्रदक्षिणेला सुरुवात, चंद्रभागा नदी किनारी शुकशुकाट

| Edited By: | Updated on: Jul 20, 2021 | 9:41 AM

पोलीस प्रशासनाने विसाव्यापासून मठापर्यंत पालख्यांना पायी घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येक पालखीसोबत 30 वारकऱ्यांना सहभागी होण्यास मुभा देण्यात आली आहे.

आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचं सावट आहे. पण गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी पोलीस प्रशासनाने वारकऱ्यांसाठी थोडी मुभा दिली आहे. पंढरपुरात मानाच्या दहा पालख्या दाखल झाल्या आहेत. यंदा दरवर्षीसारखा जरी जल्लोष होणार नसला तरी प्रत्येक पालखीसोबत यावर्षी 30 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाने विसाव्यापासून मठापर्यंत पालख्यांना पायी घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रत्येक पालखीसोबत 30 वारकऱ्यांना सहभागी होण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे दहा मानाच्या पालख्यांसोबत प्रत्येकी 30 असे एकूण 300 वारकऱ्यांना आता वारीत सहभागी होता येणार आहे.

Published on: Jul 20, 2021 09:41 AM