Alandi Palkhi | आळंदी पालखी सोहळ्यावर कोरोनाचं सावट, 37 वारकरी पॉझिटिव्ह

Alandi Palkhi | आळंदी पालखी सोहळ्यावर कोरोनाचं सावट, 37 वारकरी पॉझिटिव्ह

| Edited By: | Updated on: Jul 02, 2021 | 8:59 AM

प्रस्थान सोहळ्याला उपस्थित असलेल्या 368 वारकऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यातील 37 वारकऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आळंदी प्रस्थान सोहळ्यावर कोरोनाचं सावट पहायला मिळत आहे.

आषाढी वारीसाठी आज आळंदीतून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. मात्र तत्त्पूर्वी प्रशासनासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे. प्रस्थान सोहळ्याला उपस्थित असलेल्या 368 वारकऱ्यांनी आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यातील 37 वारकऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आळंदी प्रस्थान सोहळ्यावर कोरोनाचं सावट पहायला मिळत आहे. काल 22 वारकऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यात आता अजून 15 जणांची भर पडली आहे, तशी माहिती पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे यांनी दिलीय.