“उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिलीच, पण ते आता काँग्रेसवासी…”, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याची टीका

| Updated on: May 28, 2023 | 2:32 PM

नवी दिल्लीत आज नव्या संसद भवनाचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमाला विरोधी पक्षांसह ठाकरे गटानेही बहिष्कार टाकला होता. यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

Follow us on

मुंबई : नवी दिल्लीत आज नव्या संसद भवनाचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमाला विरोधी पक्षांसह ठाकरे गटानेही बहिष्कार टाकला होता. यावरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.”ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्ल्या त्यांच्या जयंतीच्या दिवशी भारताच्या नव्या संसदेच्या नवीन वास्तूच उद्घाटन होत आहे. काही लोकांनी यात बिबा घालण्याचा प्रयत्न केला. संसदेच्या उद्घाटनाच्या वेळी अनेकांनी असत्य खोटं राजकारण करण्याचा प्रयत्न केला. याचा करावा तेवढा निषेध आहे. पण काँग्रेसमध्ये राहून आता उद्धवजींच्या शिवसेनेनेसुद्धा सावरकरांच्या जन्मदिवशी होणाऱ्या उद्घाटनावर बहिष्कार घातला. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिलीच. पण, उद्धव ठाकरे आता विचारांनी काँग्रेसवासी होण्याच्या दिशेने चालले आहेत. सावरकर यांच्या जन्मदिवशी सुद्धा मोठ्या सोहळ्याला बहिष्कार घातला आहे याचं भयंकर वेदना आणि दुःख आम्हाला आहे”, अशी प्रतिक्रिया अशी शेलार यांनी दिली.