Ashok Chavan Video : ‘सुधीर भाऊ तुमचा हा रेस्ट पिरीअड अन् लवकरच…’, मुनगंटीवारांच्या मंत्रिपदावरून चव्हाण काय म्हणाले?

Ashok Chavan Video : ‘सुधीर भाऊ तुमचा हा रेस्ट पिरीअड अन् लवकरच…’, मुनगंटीवारांच्या मंत्रिपदावरून चव्हाण काय म्हणाले?

| Updated on: Feb 12, 2025 | 4:44 PM

सध्या सुधीर मुनगंटीवार यांचा रेस्ट पिरीअड सुरु असून लवकरच हा ब्रेक संपेल, असे वक्तव्य करत अशोक चव्हाण यांनी विश्वास व्यक्त केला आहे. बघा नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण?

सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याचे संकेत अशोक चव्हाण यांच्याकडून देण्यात आल्याचे पाहायला मिळत आहेत. सध्या सुधीर मुनगंटीवार यांचा रेस्ट पिरीअड सुरु असून लवकरच हा ब्रेक संपेल, असे वक्तव्य करत अशोक चव्हाण यांनी विश्वास व्यक्त केला आहे. काल नांदेडमध्ये मंगळवारी (११ फेब्रु.) सुधीर मुनगंटीवार यांचा जीवनगौरव पुरस्कार सोहळा पार पडला. आर्य-वैश्य समाजातर्फे हा जीवनगौरव पुरस्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर स्तुती सुमनं उधळली आणि लवकरच पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे संकेत दिलेत. मात्र हे संकेत कितीपत खरे ठरतात याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे. नांदेडच्या एका कार्यक्रमात बोलताना अशोक चव्हाण यांनी आयपीएल क्रिकेट सामन्यांचे उदाहरण दिले. ‘क्रिकेटरला पुढची बॅटिंग करण्याकरता काही दिवस रेस्ट करावा लागतो’, असे मिश्कील वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलंय. तर तुम्ही जोरदार महाराष्ट्राच्या राजकारणात बॅटिंग कराल, असं वक्तव्य करत अशोक चव्हाण यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या बाबतचा विश्वास व्यक्त केला. बघा नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण?

Published on: Feb 12, 2025 04:44 PM