मराठा आरक्षणासाठी अजूनही दरवाजा खुला, केंद्राने आरक्षण द्यावे: अशोक चव्हाण

| Updated on: May 06, 2021 | 6:37 PM

मराठा आरक्षणाचं निकालपत्र साडे पाचशे पानांच आहे. ते पाहता आपल्याकडे आजूनही दरवाजा खुला आहे. Ashok Chavan Maratha Reservation

Follow us on

मुंबई : मराठा आरक्षणाचं निकालपत्र साडे पाचशे पानांच आहे. ते पाहता आपल्याकडे आजूनही दरवाजा खुला आहे. केंद्र सरकारच्या मागास आयोगाकडे आपल्याकडे कागदपत्रं सोपवता येतील. त्यानंतर केंद्र सरकार, राष्ट्रपती आणि राष्ट्रीय मागास आयोग यांच्याकडून मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लावला जाऊ शकतो, असे अशोक चव्हाण म्हणाले.

तसेच त्यांनी फडवीस यांना आवाहन केले आहे. त्यांनी फडणवीस यांना महाराष्ट्र शांत आहे. सध्या कोरोना सुरु आहे. महाराष्ट्रामध्ये जो कोणी सहकारी चिथावणी देत असतील त्या सहकाऱ्यांना सांगावं, असे चव्हाण म्हणाले. महाराष्ट्रात सत्तेसाठी तसेच राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी ज्यांनी जो उद्योग सुरु केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील जनतेने सहभागी होऊ नये. सर्वेच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर पुढचे पाऊल उचलण्यासाठी आपण सज्ज आहोत. त्यामुळे कोरोनाची स्थिती असताना कृपया चिथावणी देण्याचे काम कोणीही करु नये, असे चव्हाण म्हणाले.