Ashok Saraf Video : पद्मश्री जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ म्हणाले, ‘माझी इच्छा होती, पण…’

Ashok Saraf Video : पद्मश्री जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ म्हणाले, ‘माझी इच्छा होती, पण…’

| Updated on: Jan 26, 2025 | 3:37 PM

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 139 जणांना पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सात जणांना पद्मविभूषण, 19 जणांना पद्मभूषण आणि 113 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय कामगिरी करणारे अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर अशोक सराफ यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. गेल्या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र भूषण हा महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. त्यानंतर आता लगेच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. त्यामुळे मला जास्तच आनंद झालाय, अशी प्रतिक्रिया अशोक सराफ यांनी दिली. पुढे ते असेही म्हणाले, जे काम करतोय त्यासाठी आपल्याला काहीतरी मिळावं अशी माझी इच्छा होती, पण इतकं मिळेल असं कधीच वाटलं नव्हतं. मी कलाकार म्हणून पहिल्यांदा रंगभूमीवर तयार झालो. रंगभूमीवरून मी एक एक पायऱ्या चढून वरती गेलो आणि आता पद्मश्रीकडे येऊन थांबलोय, असंही अशोक सराफ म्हणाले. मराठी कलाविश्वात अनेक प्रतिभावान कलाकार आहेत त्यांची कमी नाही. त्यांनी मेहनत घेतली पाहिजे. वेगळेपण जपलं पाहिजे, असं म्हणत अशोक सराफ यांनी कलकारांना मोलाचा सल्ला दिला. पुढे ते असेही म्हणाले, माझ्या दृष्टीने पद्मश्री पुरस्काराचे मोठं महत्त्व आहे. आम्ही इतक्या वर्षांपासून मेहनत केली, प्रेक्षकांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केलाय त्याचं आता भारत सरकारकडून शिक्का बसला, त्यामुळे मी सरकारचा ऋणी असल्याचे म्हणत अशोक सराफ यांनी आभार मानले. दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 139 जणांना पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

Published on: Jan 26, 2025 03:37 PM