success story : सोयाबीन, कपाशी, तूरिला दरच नाही? मग पट्ट्यानं अवलंबला हा मार्ग; आज लाखोत खेळतोय? करतोय कसली शेती पहा…

| Updated on: May 27, 2023 | 4:05 PM

तर तुरिलाही सध्या भाव मिळत नसल्याने आता काय करायचं कशाची लागवड करायची असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना सतावत आहे. अशातच येथील उच्चशिक्षित तरुण यश गणोरकर या शेतकऱ्याने पांरपारिक शेतीला फाटा देण्याचे ठरवले.

Follow us on

अमरावती : राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकरी संकटात आला आहे. अमरावतीत देखील अवकाळी आणि गारपीटमुळे संत्रा, सोयाबीन, कपाशीचे नुसकान झाले आहे. तर जो शेतमाल वाचला त्याला आता दर मिळत नसल्याचे समोर येत आहे. तर तुरिलाही सध्या भाव मिळत नसल्याने आता काय करायचं कशाची लागवड करायची असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना सतावत आहे. अशातच येथील उच्चशिक्षित तरुण यश गणोरकर या शेतकऱ्याने पांरपारिक शेतीला फाटा देण्याचे ठरवले. तसेच चीन आणि युरोपमधील शेतीचा अभ्यास केला आणि आपल्याकडे जिरेनियमची वनस्पतीची शेती लागवड केली. हि शेती पहिल्यांदाच करण्यात आली आहे. अमरावतीच्या शेंदूरजना घाट येथील यश गणोरकर याने हा अनोखी शेती केली आहे. जिरेनियम पासून सुगंधी तेलाची निर्मिती सुगंधी तेलातून सेंट, अत्तरची निर्मिती केली जाते. तर सोयाबीन, कपाशी, तूर, पिकाच्या फाटा देण्यासह भाव न मिळणे आणि वन्यप्राण्यांच्या जाचाला कटांळून या शेतीचा पर्याय घेतल्याचे गणोरकर याने सांगितलं आहे. तर ही शेतीकरण्यासाठी आपण सोशल मीडियातील युट्यूबचा आधार घेतल्याचा तो सांगतो. याच प्लॅटफोर्मवर त्याने जिरेनियम शेतीची माहिती मिळवली आणि शयस्वी शेती केली. जिरेनियम हे पीक तीन वर्षाच आहे. तर दर तीन महिन्यांला पीक हाती येत. तर यातून निघणाऱ्या तेलाला मुंबईत बाजारपेठत चांगली मागणी आहे. ज्यामुळे वर्षाला 4 लाख रुपयांपर्यंत नफा मिळत असल्याचेही त्यांने सांगितलं आहे. विशेष म्हणजे जिरेनियम याला जनावरे खात नाहीत तर इतर पिकांच्या तुलनेत अत्यंत कमी खर्च आणि फवारनीचा खर्च कमीही कमी येतो. त्यामुळे सध्या ही शेती त्याच्यासाठी वरदान ठरत असून तो लाखो रूपये कमवताना दिसत आहे.