Attari Border : अटारी सीमेवर लागल्या रांगा; पाकिस्तानी नागरिकांना घेऊन वाहनांची गर्दी
Attari Border Traffic : पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानच्या विरोधात कठोर निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता अटारी सीमेवर पाकिस्तानात परत जाणाऱ्या नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत.
अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांना घेऊन जाणाऱ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या बघायला मिळत आहेत. पहलगाम हल्ल्यानन्यत्र भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना भारतातून निघून जाण्याचे आदेश देण्यात आलेले होते. त्यानंतर आता अटारी सीमेवर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत.
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानचे संबंध चांगलेच बिघडलेले बघायला मिळत आहेत. भारत सरकारने घेतलेल्या 5 मुख्य निर्णयात पाकिस्तानच्या भारतात आलेल्या नागरिकांनी तत्काल भारत सोडवा असे आदेश दिलेले होते. 48 तासांच्या आत या नागरिकांना आपल्या देशात परत पाठवलं जाणार आहे. त्यामुळे कालपासून अटारी सीमेवर पाकिस्तानात परत जाणाऱ्या नागरिकांच्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
Published on: Apr 25, 2025 10:51 AM
