औरंगाबाद-उस्मानाबादचं नाव बदलण्याचा निर्णय कुठल्या परिस्थितीत घेतला; औरंगाबाद खंडपीठाचा राज्य सरकारला सवाल

| Updated on: Feb 02, 2023 | 7:59 AM

औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव बदलण्याचा निर्णय कुठल्या परिस्थितीत घेतला?, असा सवाल औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला केलाय. पाहा सविस्तर...

Follow us on

औरंगाबाद : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरून औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला प्रश्न विचारलेत. औरंगाबाद आणि उस्मानाबादचं नाव बदलण्याचा निर्णय कुठल्या परिस्थितीत घेतला?, असा सवाल औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला केलाय. या दोन्ही शहरांची नावे बदलण्यापूर्वी आक्षेप मागवले होते का?, अशी विचारणा औरंगाबाद खंडपीठाकडून करण्यात आली. नावं बदलण्याचा निर्णय अंतिम झाला नसताना त्याची अंमलबजावणी कशी करत आहात?, याबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिलेत. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या बाबतीत शासकीय कामकाजात काही ठिकाणी संभाजीनगर आणि धाराशिव असा उल्लेख केला होता. नामांतरावरून दाखल याचिकेत न्यायालयाने राज्य आणि केंद्र शासनाकडून स्पष्टीकरण मागवलं आहे. या शहरांच्या नामांतराबाबत जैसे थे ठेवण्याचे आदेश दिलेले असतानाही राज्य शासनाकडून शहराचं नामांतर केलं गेलं, या मुद्द्याकडे न्यायालयाने लक्ष वेधलं.