Aurangabad | मुलाच्या लग्नात शिवसेना आमदाराचा झिंगाट डान्स व्हायरल

Aurangabad | मुलाच्या लग्नात शिवसेना आमदाराचा झिंगाट डान्स व्हायरल

| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 10:12 AM

कोरोना नियमांना डावलून शिवसेना आमदारानं मुलाच्या लग्नात केलेल्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  शिवसेना आमदार उदय सिंग राजपूत यांनी झिंगाट डान्स केला. कार्यकर्त्यांसह उदयसिंह राजपूत यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

औरंगाबाद  :  कोरोना नियमांना डावलून शिवसेना आमदारानं मुलाच्या लग्नात केलेल्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  शिवसेना आमदार उदय सिंग राजपूत यांनी झिंगाट डान्स केला. कार्यकर्त्यांसह उदयसिंह राजपूत यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  लग्नसमारंभात उदयसिंग राजपूत यांच्यासह कार्यकर्त्यांनी मास्कला फाटा दिला.  आमदारांनी सोशल डिस्टंसिंग चे नियम धाब्यावर बसवत कार्यकर्त्यांसह डान्स केल्याचं समोर आलं आहे.
ओमिक्रॉनचा धोका वाढत असतानाही उदयसिंग राजपूत यांनी गर्दी जमवत डान्स केला. रात्री नऊनंतर निर्बंध असतानाही रात्री उशिरापर्यंत लग्नाचा डामडौल सुरू होता.  उदयसिंग राजपूत यांचा डान्स वायरल होताच तालुक्यातून टीकेला सुरुवात झालीय.